Pranali Kodre
क्रिकेटमध्ये अनेकदा दुखापत असतानाही खेळाडूंनी मैदानात उतरण्याची हिंमत दाखवली आहे. अशी हिंमत दाखवणाऱ्या 10 क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.
ऍशेस 2023 मालिकेतील लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात नॅथन लायनच्या पोटरीला दुखापत झाल्यानंतरही तो मैदानात उतरला आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अखेरच्या विकेटसाठी मिचेल स्टार्कसह 15 धावांची भागीदारी केली.
डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडेत रोहित शर्मा अंगठ्याला दुखापत झाल्यानंतरही 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता आणि २८ चेंडूत 51 धावांची खेळी केली.
भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेने अँटिग्वा येथे 2002 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यात हनवटी फ्रॅक्चर झाल्यानंतरही मैदाना उतरून गोलंदाजी केली होती आणि ब्रायन लाराची विकेटही घेतली होती.
वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू मार्शल हे 1984 साली इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले कसोटीत हाताचा अंगठा फ्रॅक्चर असताना फलंदाजीला आले होते. त्यांनी एका हाताने फलंदाजी केली होती, तसेच नंतर त्यांनी गोलंदाजी करत विकेटही मिळवली.
दक्षिण आफ्रिकेकडून 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना कर्स्टर्न यांचे शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूने नाक फुटले होते. त्यानंतरही ते फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते.
साल 2009 मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत ग्रॅमी स्मिथचा हात फ्रॅक्चर झाला होता. पण असे असतानाही तो 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता आणि एका हाताने फलंदाजी केली होती.
आशिया चषक 2018 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मनगटाला फ्रॅक्चर झाल्यानंतरही बांगलादेशचा तमीम इक्बाल 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता आणि त्याने 32 धावांची भागीदारीही केली होती.
झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेतील सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीच्या डोळ्याला बेल्स लागले होते. त्यानंतरही त्याने यष्टीरक्षण केले होते.
वर्ल्डकप 2019 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताचा सलामीवीर शिखर धवनचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. पण त्यानंतरही त्याने फलंदाजी कायम करत शतकी खेळी केली होती.
पाकिस्तानचा युवा गोलंदाज आशिया चषकात भारताविरुद्ध गोलंदाजी करताना पायात क्रँप आल्यानंतरही गोलंदाजी केली होती.