गोमन्तक डिजिटल टीम
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे देशातील इतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत सर्वाधिक पगार घेतात. केसीआर यांना 4,10,000 रुपये मासिक वेतन मिळते.
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रतिमहिना 3,90,000 रुपये पगार मिळतो.
उत्तर प्रदेश सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या योगी आदित्यनाथ यांना 3,65,000 रुपये पगार मिळतो.
संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे 2,15,000 रुपये वेतन घेतात.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पगार म्हणून महिन्याला 3, 21,000 रुपये मिळतात.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना प्रतिमहिना 3,10,000 रुपये वेतन मिळते.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा पगार इतरांच्या तुलनेत कमी आहे. त्यांना दरमहा 1,75,000 रुपये मिळतात.