Akshata Chhatre
जर तुम्ही तासन्तास लॅपटॉपवर काम करत असाल किंवा मान खाली झुकवून फोन वापरत असाल, तर तुम्हालाही होऊ शकते 'टेक नेक'ची समस्या
मान सतत खाली झुकवून ठेवल्याने त्यात सूज, ताठरपणा आणि दुखापतीचा धोका वाढतो.
याची सामान्य लक्षणे म्हणजे डोकेदुखी, पाठीत ताठरपणा, जबड्यांमध्ये वेदना आणि हातांना मुंग्या येणे
यापासून वाचण्यासाठी, सर्वात आधी तुमचे डिव्हाईस योग्य उंचीवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला मान खाली झुकवावी लागणार नाही.
दर तासाला ब्रेक घ्या आणि थोडा वेळ चाला. कामाव्यतिरिक्तच्या वेळेत स्क्रीनचा वापर कमी करा आणि शारीरिक ॲक्टिव्हिटीवर लक्ष द्या.
'चिन टक', 'हँड टू इअर स्ट्रेच' आणि 'कोब्रा पोज' यांसारखे सोपे व्यायाम टेक नेकमुळे होणारे असंतुलन दूर करतात
तुमच्या ताठर झालेल्या स्नायूंना आराम देतात.