Pranali Kodre
भारत आणि वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांची वनडे मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे.
कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला 1-0 अशा फरकाने पराभूत केल्यानंतर आता वनडे मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज आहे.
कसोटी मालिकेचा भाग नसलेले पण वनडे संघात असलेले भारतीय खेळाडूही आता वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले असून त्यांनीही सरावाला सुरुवात केली आहे.
भारतीय संघासाठी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे, तर हार्दिक पंड्या उपकर्णधार असेल.
वनडे मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 27, 29 आणि 1 जुलै रोजी पार पडणार आहे. पहिले दोन सामने बार्बाडोसला आणि अखेरचा सामना त्रिनिदादला होणार आहे.
वनडे मालिकेतील सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत 139 वनडे सामने खेळवण्यात आले असून 70 सामने भारतीय संघाने आणि 63 सामने वेस्ट इंडिज संघाने जिंकले आहेत. 2 सामने बरोबरीत सुटलेत, तर 4 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.