Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. वनडे वर्ल्डकपचे हे 13 वे पर्व आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवण्यात येणार आहे.
हा वर्ल्डकप मायदेशात खेळण्यासाठी भारतीय संघ देखील सज्ज असून गुवाहाटीला पोहचला आहे.
28 सप्टेंबर रोजी भारतीय संघ गुवाहाटीला पोहोचला आहे.
गुवाहाटीला आल्यानंतरचे भारतीय संघाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
भारताला वर्ल्डकप 2023 पूर्वी पहिला सराव सामना इंग्लंडविरुद्ध गुवाहाटीला 30 स्पटेंबर रोजी खेळायचा आहे.
त्यानंतर भारतीय संघ दुसरा सराव सामना नेदरलँड्सविरुद्ध 3 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरमला खेळणार आहे.
भारताचे दोन्ही सराव सामने दुपारी 2 वाजता सुरू होणार आहेत.
मुख्य वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.