World Cup 2023 साठी टीम इंडियाचा केशरी रंगाच्या जर्सीत सराव

Pranali Kodre

वर्ल्डकप 2023

भारतात वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.

World Cup 2023 | Twitter

पहिला सामना

या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.

India vs Australia

सराव

या स्पर्धेसाठी भारतीय संघही कसून सराव करत आहे.

KL Rahul

केशरी रंगाचे ट्रेनिंग किट

दरम्यान, सरावावेळी भारतीय संघातील खेळाडूंनी केशरी रंगाची जर्सी घातल्याचे दिसले होते.

Jasprit Bumrah - Virat Kohli

नवीन ट्रेनिंग किट

भारतीय संघाचे केशरी रंगाचे हे नवीन ट्रेनिंग किट आहे.

Suryakumar Yadav

फोटो व्हायरल

भारतीय संघाचे केशरी रंगाच्या ट्रेनिंग किटमधील अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.

Team India | Twitter

ट्रेनिंग किट

यापूर्वीही भारतीय संघाने अनेकदा ग्रे, लाल, निळे असे विविध रंगांची ट्रेनिंग किट वापरले आहेत. आता भारतीय संघाने केशरी रंगाची ट्र्रेनिंग किट घातले आहेत.

Kuldeep Yadav, Suryakumar Yadav | Twitter

2019 वर्ल्डकप

विशेष म्हणजे यापूर्वी 2019 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने निळ्या आणि केशरी रंगांचा समावेश असलेली जर्सीही घातली होती.

MS Dhoni | World Cup 2019 | Twitter

सामने निळ्या जर्सीतच...

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की जरी भारतीय संघ वर्ल्डकप 2023 साठी केशरी रंगाची ट्रेनिंग किट वापरत असला, तरी सामन्यांमध्ये खेळताना मात्र निळ्या रंगाचीच जर्सी वापरणार आहे.

Rohit Sharma | Ravindra Jadeja

World Cup 2023: भारतीय संघाकडे तब्बल 1458 सामन्यांचा अनुभव

Team India | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी