Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने किट स्पॉन्सर म्हणून आदिदास (Adidas) ब्रँडशी करार केला आहे.
त्यानंतर आता Adidas ने भारतीय संघाच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.
त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपमधील अंतिम सामन्यात भारतीय संघ ही नवीन जर्सी घालून उतरणार आहे.
या नव्या जर्सीत भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारच्या जर्सीच्या खांद्यावर Adidas च्या लोगोतील स्ट्रीप्ससारख्या स्ट्रीप्स आहेत.
कसोटीची जर्सी नेहमीप्रमाणे पांढरी असून पाठीवरील खेळाडूंची नावे निळ्या रंगात आहेत. हीच पांढरी जर्सी घातलेला संघ कसोटी चॅम्पियनशीपमधील अंतिम सामना खेळताना दिसेल.
तसेच वनडे आणि टी20 साठी भारतीय संघाची जर्सी निळ्या रंगाची आहे.
या नव्या जर्सीच्या प्रोमोचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघातील खेळाडू दिसून येत आहेत.