World Cup 2023 सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ

Pranali Kodre

भारताचा विजय

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध 302 धावांनी विजय मिळवला.

Team India

धावसंख्या

या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला.

Team India

सातवा विजय

हा भारताचा या स्पर्धेतील सलग सातवा विजय ठरला.

Team India

उपांत्य सामन्यात प्रवेश

याबरोबरच भारताने 14 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.

Team India

पहिला संघ

भारत वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्के करणारा पहिला संघही ठरला.

Team India

या संघांना केलं पराभूत

भारताने श्रीलंकेपूर्वी या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांना पराभूत केले आहे.

Team India

आठव्यांदा उपांत्य फेरी

भारताने वनडे वर्ल्डकप इतिहासात उपांत्य फेरीत पोहचण्याची ही आठवी वेळ आहे.

Team India

याआधीचे उपांत्य सामने

भारतीय संघ 2023 पूर्वी 1983, 1987, 1996, 2003, 2011, 2015 आणि 2019 या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीत पोहचला आहे.

Team India

रोहितने 10 वर्षांपूर्वी कलेला वनडेत पहिल्यांदा डबल धमाका

Rohit Sharma | Twitter/ICC
आणखी बघण्यासाठी