Akshata Chhatre
शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारा नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा एक शिल्पकार असतो.
ते केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत नाहीत, तर जीवन जगण्याची कला, शिस्त, संस्कार आणि योग्य-अयोग्य यातील फरकही शिकवतात.
तुमच्या आयुष्यात शिक्षकाचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्ही खालील संदेश पाठवू शकता.
तुमच्या ज्ञानदीपामुळेच माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव ऋणी राहीन. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक हे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणारे नसतात, तर आयुष्यभरासाठी मार्ग दाखवणारे दीपस्तंभ असतात. अशा सर्व गुरुजनांना माझा मनापासून नमस्कार. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणाऱ्या या शिल्पकारांना माझा सलाम. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असतात. ते विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि क्षमतांना ओळखून त्यांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित करतात.