Akshata Chhatre
खरं तर केस कितीही लांब, दाट किंवा स्टायलिश असले, तरी जर त्यात कोरडेपणा, रुक्षपणा आणि डलनेस असेल, तर संपूर्ण लूकच फिका पडतो
महागडे शॅम्पू आणि कंडिशनरही अशा वेळी फार काळ टिकणारा फरक दाखवत नाहीत. मात्र आपल्या स्वयंपाकघरातच मिळणारी एक साधी नैसर्गिक गोष्ट चहा पावडर केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
चहा पावडरमध्ये भरपूर टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांमधील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवून ठेवतात.
टॅनिन केसांच्या क्यूटिकल्सना स्मूद करतं, ज्यामुळे केस मऊ, सरळ आणि गुळगुळीत होतात.
२–३ चमचे चहा पावडर २ कप पाण्यात ५–७ मिनिटं उकळा. पूर्ण थंड झाल्यावर गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. प्रथम केस सौम्य शॅम्पूने धुवा, मग हे चहा पाणी मुळांपासून टोकांपर्यंत स्प्रे करा आणि हलक्या हातांनी मसाज करा.
१०–१५ मिनिटं तसेच राहू द्या आणि नंतर फक्त पाण्याने धुऊन टाका. कंडिशनरची गरज भासत नाही. हा उपाय आठवड्यातून १–२ वेळा केल्यास केसांचं नैसर्गिक टेक्सचर सुधरते.