Akshata Chhatre
चहा हा आपल्या देशातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, पण चहा करताना आधी दूध घालावे की पाणी हा प्रश्न अनेकांना पडतो.
वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास, चहा-पत्तीतील टॅनिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स गरम पाण्यात पटकन विरघळतात, त्यामुळे पाणी उकळून त्यात पत्ती घातल्यास चहाचा रंग, सुगंध आणि चव खुलते.
त्यानंतर दूध मिसळल्याने चहा अधिक क्रिमी व मऊसर होतो.
थेट दुधात पत्ती टाकल्यास दुधातील प्रथिने काही घटकांशी संयोग करून चव कमी करतात आणि दूध पटकन जळण्याचा धोका असतो.
त्यामुळे परिपूर्ण चहा बनवण्यासाठी नेहमी आधी पाणी उकळा.
मग पत्ती टाका आणि शेवटी दूध मिसळा.
अशा पद्धतीने बनवलेला चहा केवळ सुगंधी व स्वादिष्टच नाही, तर प्रत्येक घोटाला समाधान देणारा असतो.