Manish Jadhav
निसान मोटर इंडियाने त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही निसान मॅग्नाइटवर बंपर बेनिफिट देण्याचा निर्णय घेतला आहे.
निसान मोटर इंडिया निसान मॅग्नाइटवर तब्बल 86,000 बेनिफिट्स देणार आहे. कंपनीने या शानदार कारच्या 2 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार केल्यानंतर ही तगडी ऑफर दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच, निसानने भारतीय मार्केटमध्ये मॅग्नाइटचे सीएनजी व्हर्जन लॉन्च केले, ज्याची एक्स-शोरुम किंमत 6.89 लाख एवढी आहे.
मॅग्नाइटमध्ये बसवलेले सीएनजी किट मोटोझेन नावाच्या कंपनीने डिझाइन, उत्पादन आणि चाचणी केली आहे. त्यात 12 किलोचा सिंगल सिलेंडर किट आहे, जो सरकार मान्यताप्राप्त इन्स्टॉलेशन सेंटरमध्ये बसवला जातो.
भारतीय मार्केटमध्ये निसान मॅग्नाइट सीएनजी मारुती सुझुकी फ्रंटएक्स सीएनजी, टाटा पंच सीएनजी आणि ह्युंदाई एक्सटर सीएनजीशी स्पर्धा करते.
जर तुम्ही बजेट फ्रेंडली घेण्याचा विचार करत असाल तर निसान मॅग्नाइट सीएनजी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतो.