Manish Jadhav
अजमेरचा तारागढ किल्ला हा आशियातील पहिल्या सर्वात जुन्या डोंगरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो. या विस्तीर्ण किल्ल्याची निर्मिती 7व्या शतकात चौहान वंशाचे राजे अजयराज चौहान यांनी केली होती.
सुरुवातीला या किल्ल्याला 'अजयमेरु दुर्ग' म्हटले जायचे. परंतु, मेवाडचे प्रसिद्ध शासक राणा रायमल यांचे शूर पुत्र कुंवर पृथ्वीराज यांनी हा किल्ला जिंकला आणि त्यांच्या पत्नी 'ताराबाई' यांच्या नावावरून याचे नाव 'तारागढ' ठेवले.
हा किल्ला अरवली पर्वताच्या 'बिटल' नावाच्या उंच टेकडीवर समुद्रसपाटीपासून सुमारे 2855 फूट उंचीवर बांधला गेला. त्यामुळे या किल्ल्याला स्थानिक पातळीवर 'गड बिटल' या नावानेही ओळखले जाते.
भारताचे महान योध्दे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या काळातील राजकीय घडामोडींचे हा किल्ला मुख्य केंद्र होता. या किल्ल्यावरून त्यांनी अनेक युद्धे आणि मोहिमांचे नियोजन केले होते.
किल्ल्याचे गव्हर्नर हजरत मीरान सैय्यद हुसेन यांच्या बलिदानाची कथा या किल्ल्याशी जोडलेली आहे. किल्ल्याच्या आत मीरान साहेबांची दर्गा आणि त्यांच्या लाडक्या घोड्याची मजार आहे, जिथे डाळ अर्पण करण्याची अनोखी प्रथा आहे.
शत्रूच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी या किल्ल्यात अनेक गुप्त भुयारी मार्ग तयार करण्यात आले होते. तसेच पाण्यासाठी डोंगराच्या खडकांमध्ये खोदलेली विशाल पाण्याची टाकी आजही विस्मयचकित करतात.
मुघल काळातही या किल्ल्याला मोठे महत्त्व होते. मुघल सम्राट शाहजहानचा मोठा मुलगा दारा शुकोह याने औरंगजेबाविरुद्धच्या वारसा हक्काच्या युद्धात पराभूत झाल्यानंतर याच तारागढ किल्ल्यात आश्रय घेतला होता.