पावसात स्कूटी किंवा बाईकवरून प्रवास करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

दुचाकी वाहने चालवणारे लोक पावसात पडून जखमी होण्याची शक्यता असते. म्हणून बाईक आणि स्कूटी चालवताना काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते.

Monsoon Safety Tips | Dainik Gomantak

टायरकडे लक्ष द्या

पावसात बाईक किंवा स्कूटी नेण्यापूर्वी टायर तपासायला विसरू नका. जर तुमच्या टायरची पकड जीर्ण झाली असेल तर तुमचे वाहन रस्त्यावर सहज घसरते. त्यामुळे उशीर न करता टायर बदलून घ्या.

Monsoon Safety Tips | Dainik Gomantak

पाण्यातून गाडी हळू चालवा

पावसाळ्यात बाईक किंवा स्कूटी हळू चालवणे योग्य असते. त्यामुळे वाहनावर तुमचे नियंत्रण राहील आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तात्काळ ब्रेक लावून वाहन थांबवू शकता.

Monsoon Safety Tips | Dainik Gomantak

सुरक्षित अंतर राखणे

पावसात तुमच्या समोर, मागे आणि पुढे जाणाऱ्या वाहनांपासून नेहमी अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच ओव्हरलोड वाहनांपासून पुरेसे अंतर ठेवा.

Monsoon Safety Tips | Dainik Gomantak

ब्रेकचा योग्य वापर

पावसाळ्यात मागील ब्रेक लावणे केव्हाही चांगले. यामुळे तुमची गाडी हळूहळू थांबते. समोरचा ब्रेक लावल्याने गाडी अचानक थांबते. यामुळे तुमची गाडी घसरू शकते.

Monsoon Safety Tips | Dainik Gomantak

पाणी साचलेला रास्ता घेणे टाळा

रस्त्यावरील खड्डे न दिसल्यामुळे त्यामध्ये पडण्याची शक्यता तर असतेच. त्यासोबत बाईक किंवा स्कूटीच्या एक्झॉस्टमध्येही पाणी जाऊ शकते. त्यामुळे तुमची गाडी बंद पडू शकते.

Monsoon Safety Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा