Rahul sadolikar
आपल्या थेट आणि बेधडक स्वभावाने परिचित असणाऱ्या स्वरा भास्करचा आज 35 वा वाढदिवस.
यावर्षी स्वरा चर्चेत राहिली त्याचं कारण म्हणजे स्वराचं लग्न.
समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसोबत यांच्यासोबत स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केले आणि ती ट्रोल झाली.
सोशल मिडीयावर काही कट्टरतावादी युजर्सनी स्वराच्या या निर्णयावर खूपच चिखलफेक केली.
मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यामुळे सोशल मिडीयावर लग्नाच्या काही दिवसानंतरही ती ट्रोल होत राहिली.
स्वराने मात्र या ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं
स्वराने रांझना, नील बटे सन्नाटा, तनू वेड्स मनू अशा मोजक्या चित्रपटातुन आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.