Rahul sadolikar
अभिनेत्री गायत्री जोशीने आपल्या साधेपणातल्या सौंदर्याने स्वदेस चित्रपटात चाहत्यांना घायाळ केलं होतं.
सुमारे 19 वर्षांपूर्वी 'स्वदेस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गायत्री जोशीने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती.
करिअरच्या शिखरावर असताना गायत्रीने बॉलीवूडला अलविदा केला आणि लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला होता.
गायत्री जोशीने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शोबिझचे जग सोडून कौटुंबिक जीवनात जाण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल खुलासा केला आहे.
गायत्रीचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात गायत्रीने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे प्रसिद्ध प्रमोटर विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.
या गायत्रीने मुलाखतीत लग्नाचा हा एवढा मोठा निर्णय हे नियोजित नसल्याचे म्हटले आहे.
ती म्हणाली, 'माझे पती विकास ओबेरॉय यांना भेटून मला जाणीव झाली की मला बॉलिवूडमध्ये असण्यापेक्षा एक परिपूर्ण कौटुंबिक जीवन हवे आहे.