Mumbai Indians साठी 'हा' कारनामा करणारा सूर्या सचिननंतर दुसराच

Pranali Kodre

मुंबईचा पराभव

आयपीएल 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी पराभूत केले.

Suryakumar Yadav | www.iplt20.com

सूर्याचं अर्धशतक

पण या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 61 धावांनी खेळी करत चांगली झुंज दिली होती.

Suryakumar Yadav | www.iplt20.com

सूर्याच्या 600 धावा

या खेळीदरम्यान सूर्यकुमारने आयपीएल 2023 स्पर्धेत 600 धावांचा टप्पा ओलांडला. त्याच्या या हंगामात 16 सामन्याच 605 धावा झाल्या आहेत.

Suryakumar Yadav | www.iplt20.com

दुसराच फलंदाज

त्यामुळे आता सूर्यकुमार एका आयपीएल हंगामात 600 पेक्षा जास्त धावा करणारा मुंबई इंडियन्सचा दुसराच फलंदाज ठरला आहे.

Suryakumar Yadav | www.iplt20.com

मास्टर-ब्लास्टरचा विक्रम

यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून 600 पेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा पहिल्यांदा केला होता.

Sachin Tendulkar | Twitter

आयपीएल 2010

सचिन तेंडुलकरने 2010 आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना 618 धावा केल्या होत्या.

Sachin Tendulkar | Twitter

सचिन अन् सूर्याशिवाय कोणी नाही

सचिन आणि सूर्यकुमार यांच्या व्यतिरिक्त एका आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून 600 पेक्षा जास्त धावा अजून कोणी केलेल्या नाहीत.

Suryakumar Yadav | www.iplt20.com

सचिन तेंडुलकर

मुंबई इंडियन्सकडून एका आयपपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन आणि सूर्यकुमार पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावरही सचिनचेच नाव आहे. सचिनने 2011 हंगामात 553 धावा केल्या होत्या.

Sachin Tendulkar | Twitter
Ravi Shastri | Dainik Gomantak