Pranali Kodre
आयपीएल 2023 मध्ये 16 एप्रिल 2023 रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्मा पोटदुखीमुळे खेळला नाही.
रोहित मुंबई इंडियन्सचा सध्या नियमित कर्णधार आहे, पण त्याच्या अनुपस्थितीत स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने या संघाचे केकेआरविरुद्ध नेतृत्व केले.
त्यामुळे सुर्यकुमार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा आठवा खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्माने आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सचे 151 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सचे 55 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
तसेच हरभजन सिंगने 30 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळले आहे.
शॉन पोलॉकने 2008 साली मुंबई इंडियन्सने 4 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
रिकी पाँटिंगने 2013 साली मुंबई इंडियन्सने 6 सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले होते.
कायरन पोलार्डने 9 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद निभावले.
ड्वेन ब्रावोने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सने एका सामन्यात नेतृत्व केले होते.