Kavya Powar
येत्या 20 एप्रिल 2023 वैशाख अमावास्येला या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आहे.
शास्त्रात सांगितल्यानुसार ग्रहण कालावधीत काही गोष्टींचे पालन करणे अनिवार्य असते.
यंदाच्या ग्रहणाबद्दल सुहोता आपटे, सोमयाजी यांनी माहिती दिली आहे.
आपटे यांनी सांगितल्याप्रमाणे, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
त्यामुळे या कालावधीत कोणतेच वेद, नियम पाळण्याची गरज नाही.
हे सूर्यग्रहण भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड आणि न्यूझीलंडमध्ये दिसणार आहे.
त्यामुळे गरोदर महिला, लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्ती कुणीही ग्रहण पाळण्याची गरज नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये ग्रहण कालावधी सकाळी 10:15 ते 1:15 पर्यंत असणार आहे.
तर न्यूझीलंडमध्ये संध्याकाळी 4:30 ला ग्रहण सुरू होऊन 5:30ला समाप्त होणार आहे.