Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला विविध पदार्थ बनवून खाऊ घालायला आवडतात, हे अनेकांना माहित असेल.
आता सुरेश रैनाने स्वत:चे रेस्टॉरंटच सुरू केले आहे.
सुरेश रैनाने नेदरलँड्समधील अमस्टरडॅम शहरात त्याचे रेस्टॉरंट सुरू केले आहे.
रैनाने त्याच्या नव्या रेस्टॉरंटबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
सुरेश रैनाच्या रेस्टॉरंटचे नाव 'रैना'असे असून या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना भारतीय जेवणाची अस्सल चव चाखायला मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
रैनाच्या या नव्या व्यावसायाबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू विराट कोहलीनेही कौतुक केले असून जेव्हाही तो अमस्टरडॅममध्ये येईल, तेव्हा या रेस्टॉरंटला भेट देईल अशी ग्वाहीही त्याने दिली आहे.
रैनाने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ टी२० सामने खेळले आहे. यामध्ये मिळून त्याने ७००० हून अधिक धावा केल्या आहेत.