Kavya Powar
तुम्हाला माहिती आहे का योग्य सूर्यप्रकाश मिळाल्याने तुम्हाला टाईप 2 मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकतो.
या संशोधनात, टाइप 2 मधुमेह असलेल्या काही रुग्णांना दोन स्थितीत ठेवण्यात आले होते - प्रथम, नैसर्गिक प्रकाश असलेल्या खोलीत आणि दुसरे, कृत्रिम प्रकाश असलेल्या खोलीत.
असे आढळून आले की जेव्हा रुग्ण नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात आले, तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त काळ सामान्य राहिली.
सध्या आपण दिवसभर खोलीतच बसून असतो
सूर्यप्रकाश आपल्या शरीराला निरोगी ठेवतो. त्यामुळे मधुमेहासारखे आजार टाळता येतात.
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.
सूर्यप्रकाशामुळे आपले हार्मोन्स संतुलित राहतात. कमी प्रकाशामुळे कमी इन्सुलिन तयार होते, त्यामुळे साखरेची पातळी वाढते.