IND vs WI: त्रिनिदादमध्ये सुनील गावसकरांचा खास सन्मान

Pranali Kodre

दुसरा कसोटी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 20 जुलैपासून त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल येथे कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना सुरु आहे.

India vs West Indies | Twitter

100 वा सामना

हा भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 100 वा कसोटी सामना आहे.

India vs West Indies | Twitter

सन्मान

त्यामुळे १०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने सुनील गावसकरांचा 22 जुलै रोजी क्विन्स पार्क क्रिकेट क्लबकडून सन्मान करण्यात आला.

Sunil Gavaskar | Instagram

फोटो आणि व्हिडिओ

या सत्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ स्वत: गावसकरांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sunil Gavaskar | Instagram

'प्रिन्स ऑफ त्रिनिदाद'

त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्याबरोबर वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू आणि 'प्रिन्स ऑफ त्रिनिदाद' म्हणून ओळखले जाणारे ब्रायन लारा देखील दिसत आहेत.

Sunil Gavaskar | Instagram

चाहत्याशी संवाद

गावसकरांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका चाहत्याशीही संवाद साधताना दिसत आहेत

Sunil Gavaskar | Instagram

वेस्ट इंडिजविरुद्ध गावसकरांच्या धावा

गावसकरांनी त्याच्या कारकिर्दीत वेस्ट इंडिजविरुद्ध 38 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 60.46 च्या सरासरीने 3144 धावा केल्या आहेत.

Sunil Gavaskar | Twitter

शतके आणि अर्धशतके

गावसरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत.

Sunil Gavaskar | Twitter
Yuzvendra Chahal | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी