दैनिक गोमन्तक
उन्हाळा सुरु झाला की आपली काळजी घेणे महत्वाचे असते.
उष्णता वाढल्याने प्रतिकारशक्ती कमी होते, डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्या वाढू लागतात.
उन्हाळ्यात सुती कपडे वापरणे सोयिस्कर मानले जाते. सुती कपड्यात उन्हामुळे येणाऱ्या घामाचा त्रास जाणवत नाही. शरीराला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.
उन्हाळ्यात आपण थंड पेय सेवन कऱण्यावर भर देतो, मात्र हे थंड पेय आरोग्यदायी असावे यावर लक्ष देणे महत्वाचे आहे.
आपण घरी असलो किंवा घराबाहेर असलो तरी योग्य प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे, याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
फळे व पालेभाज्या यांचा आपल्या आहारात समावेश असायला हवा.
उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे आपली त्वचा काळवंडते. त्यामुळे योग्य वेळी तज्ञांच्या सल्ल्याने आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्वाचे असते.