दैनिक गोमन्तक
फोमो अर्थात फिअर ऑफ मिसिंग आऊट ही संकल्पना सगळ्यांनाच माहीत असेल
‘जे न-अल्फा’ ही अशी पिढी आहे, की जी जन्माला येतानाच ‘सोशल मीडिया’चे बाळकडू घेऊन आले. विशेषतः किशोरवयीन मुलांना सोशल मीडियाबरोबरचे कनेक्शन थोडा वेळ जरी तुटले, तरी सहन होत नाही.
फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर नेहमी लाइव्हची सवय असलेल्या एखाद्या किशोरवयीन मुलाला दोन- तीन तास जरी नेटवर्क मिळाले नाही, तरी आपले काहीतरी राहून गेलेय याची तीव्र चिंता वाटू लागते.
चुकून मोबाईल बंद पडला, की आपल्या शरीराचाच एखादा भाग काम करत नाही, असे वाटू लागते. आपल्याबद्दल इतर लोक काय बोलत असतील, याचा प्रचंड ताण वाटू लागतो. मग यातून सारखे आपले व्हॉट्सअप, फेसबुक इ. चेक करणे सुरू होते.
समजा दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त ‘लाइक्स’ मिळाल्या, तर इर्षा निर्माण होते. यातून मग हळूहळू शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू लागतो, झोप लागत नाही, एकाग्र होता येत नाही, अजून एकटेपणा जाणवू लागतो, नैराश्य येऊ लागते.
प्रत्यक्षात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींवर विश्वास ठेवा. प्रत्यक्ष भेटून समोरासमोर गप्पा मारल्या, तर ताणही कमी होतो आणि आपले मित्र कसे आहेत हे समजते.
आपल्या हक्काच्या पालकांचासोबत वेळ घालवा त्यांच्याशी गप्पा मारा. वेळ पडल्यास मानसोपचार तज्ज्ञ व डॉक्टरांचा सल्ला घ्या.