Akshata Chhatre
आपले केस सुंदर, दाट आणि चमकदार असावेत अशी इच्छा प्रत्येकाची असते. अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, कारण केवळ बाहेरून केलेली काळजी पुरेशी नसते.
केसांसाठी नैसर्गिक तेल मसाज अमृतसमान ठरतो. मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचतं.
खोबरेल तेल, बदाम तेल किंवा अरंडीचं तेल वापरून आठवड्यातून दोनदा मसाज करणं फायदेशीर ठरतं.
तेल लावल्यानंतर लगेच केस धुवू नयेत; दोन-तीन तास तसेच ठेवले तर तेल अधिक खोलवर शोषलं जातं आणि ताण कमी होतो.
केस मऊ करण्यासाठी तुम्ही अंडं व कोरफडीचा गर याचा मास्क वापरू शकता.
कसुरी मेथी ८ ते १० तास पाण्यात भिजवा, नंतर त्याची जाडसर पेस्ट करून केसांना लावा आणि काही वेळाने स्वच्छ धुवा.
पौष्टिक आहार आणि नैसर्गिक उपायांचा समन्वय केल्यास तुमचे केस केवळ सुंदरच नाहीत, तर खऱ्या अर्थाने आरोग्यदायी बनतील.