Akshata Chhatre
पावसाळा आला की वातावरणात गारवा आणि दमटपणा वाढतो, आणि याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो.
या काळात अनेकांना वारंवार अपचन, पोट फुगणे, गॅस, जडपणा, मळमळ आणि भूक मंदावणे अशा समस्या जाणवतात.
पोट ठीक नसल्यामुळे फक्त पचनच नाही, तर संपूर्ण शरीर थकल्यासारखं वाटतं.
यामागचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात पचनसंस्था मंदावते, त्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही.
अशा वेळी महागड्या औषधांऐवजी घरच्या घरी सहज करता येणारे काही सोपे उपाय खूपच उपयोगी पडतात.
पचनक्रिया बिघडल्यास दररोज सकाळी जिरे पाण्यात उकळून ते पाणी गाळून कोमटपणी प्यायल्याने पचन सुधारतं आणि पोटातील गॅस कमी होतो.
हिंग हा देखील नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. अर्धा कप गरम पाण्यात चिमूटभर हिंग घालून प्यायल्यास लगेच आराम मिळतो.