Pranali Kodre
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर 28 जूनपासून सुरु झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी केली आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात 184 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या. हे स्मिथचे कसोटी क्रिकेटमधील 32 वे शतक ठरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 44 वे शतक आहे.
स्मिथने हे 32 वे कसोटी शतक 99 व्या कसोटी सामन्यांमधील 174 व्या डावात खेळताना केले आहे. त्यामुळे तो सर्वात जलद 32 कसोटी शतके करणारा खेळाडू ठरला आहे.
स्मिथने सर्वात जलद 32 कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
रिकी पाँटिंगने 176 कसोटी डावात 32 कसोटी शतके केली होती.
सचिन तेंडुलकरने 179 डावात 32 वे कसोटी शतक झळकावले होते.
युनूस खानन 193 डावात 32 कसोटी शतके पूर्ण केली होती.
सुनील गावसकरांनी 195 व्या डावात खेळताना 32 वे कसोटी शतक झळकावले होते.