Pranali Kodre
मुथय्या मुरलीधरन दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असून 17 एप्रिल रोजी तो त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे.
त्याच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट चाहत्यांना मोठे सरप्राईज मिळाले असून लवकरच त्याच्या जीवनावर अधारित बायोपिक पाहाता येणार आहे.
मुरलीधरनने त्याच्या '800' बायोपिकचा फर्स्ट लूक जाहीर केला आहे. यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या बायोपिकबद्दल उत्सुकता दाखवली आहे.
हा चित्रपट तमिळ भाषेत तयार होणार असून हिंदी आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.
हा चित्रपट एमएस श्रीपती यांनी लिहिला असून दिग्दर्शितही त्यांनीच केला आहे. तसेच मुरलीधरनची भूमिका अभिनेता मधुर मित्तर निभावणार आहे.
मुरलीधरनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 133 सामन्यांमध्ये सर्वाधिक 800 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचमुळे त्याच्या बायोपिकचे नावही '800' ठेवण्यात आले आहे.
मुरलीधरनने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 495 सामन्यांमध्ये 1347 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच्या 534 वनडे विकेट्सचा आणि 13 टी20 विकेट्स घेतल्या आहेत.
साल 2017 मध्ये मुरलीधरन श्रीलंकेचा पहिला गोलंदाज ठरला, ज्याचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले.