गोमंतक ऑनलाईन टीम
ब्रिटनचे राजे तिसरे चार्ल्स यांचा राज्यारोहन सोहळा आज पार पडला.
बकिंगहम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर अॅबीपर्यंत मिरवणुकीने सोहळ्याची सुरवात झाली. या मार्गावर नागरिकांनी गर्दी केली होती.
किंग चार्ल्स यांच्या पत्नी क्वीन कॅमिला यांचाही राज्याभिषेक करण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, युक्रेनचे पंतप्रधानांसह जगभरातून व्हीव्हीआयपीज या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
राज्याभिषेकादरम्यान राजे चार्ल्स यांना पवित्र गॉस्पेलवर हात ठेवून शपथ देण्यात आली.
राज्याभिषेकानंतर राजे चार्ल्स (तृतीय) यांनी यावेळी वेस्टमिन्स्टर अॅबेमध्ये बोलताना, मी इथे सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आलो आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
राज्याभिषेकानंतर बाल्कनीतून किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांनी उपस्थितांना अभिवादन केले. यावेळी नागरिकांनी गॉड सेव्हज किंग असा जयघोष केला.