Pramod Yadav
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपट्टू जॉन्टी रोड्स सध्या गोव्यात आहे.
गोव्यातील रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या नारळांसोबत त्याने सेल्फी घेत तो एक्स सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे.
जॉन्टीसोबत त्याची फॅमिली देखील आहे.
जॉन्टी गोव्यातील मासे, नारळ आणि निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडला आहे.
जॉन्टीने गोव्याची सैर केल्याचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
त्याने काही दिवसांपूर्वी आगोंद किनाऱ्यावर मसालेदार माशांचा आस्वाद घेतला.
सध्या भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषकाची धूम आहे, त्यासाठी तो कॉमेंट्री देखील करत आहे.