Pranali Kodre
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज फाफ डू प्लेसिस 13 जुलै रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.
फ्रँकॉइज डू प्लेसिस असे त्याचे पूर्ण नाव आहे.
डू प्लेसिसने त्याच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी 19 वर्षांखाली संघाचेही प्रतिनिधित्व केले.
डू प्लेसिसने त्याच्या कारकिर्दीत 69 कसोटी सामने खेळताना 10 शतके आणि 21 अर्धशतकांसह 4163 धावा केल्या आहेत.
त्याने 143 वनडे सामने खेळताना 12 शतके आणि 35 अर्धशतकांसह 5507 धावा केल्या आहेत. तसेच डू प्लेसिसने 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 1 शतकासह 1528 धावा केल्या आहेत.
डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी कर्णधारांमध्येही गणला जातो. त्याने 36 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना 18 विजय मिळवले, तसेच 15 पराभव स्विकारले. याबरोबरच 3 सामने अनिर्णित राहिले.
तसेच डू प्लेसिसने 39 वनडे सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना 28 सामन्यांत विजय, तर 10 सामन्यात पराभव स्विकारले आणि 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
फाफ डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली 37 टी20 सामन्यांपैकी 23 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला, तर 13 सामन्यांत पराभव स्विकारला आणि 1 सामना बरोबरीत सुटला.
डू प्लेसिस आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघाकडून खेळला असून 2023 हंगामापर्यंत आयपीएलमध्ये त्याने 130 सामने खेळले असून 36.90 च्या सरासरीने 33 अर्धशतकांसह 4133 धावा केल्या आहेत.