Pranali Kodre
भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव गणले जाते. तो 8 जुलैला आपला वाढदिवस साजरा करत आहे.
बीसीसीआयचा माजी अध्यक्ष राहिलेल्या गांगुलीने त्याच्या खेळाडू म्हणून कारकिर्दीत घडवताना अनेक विक्रमही केले आहेत.
गांगुलीने 1997 साली पाकिस्तानविरुद्ध सलग चार वनडे सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला असून हा विश्वविक्रम आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक करण्याचा विक्रम गांगुलीच्या नावावर असून त्याने 1999 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक 3 शतके करण्याचा विक्रम संयुक्तरित्या गांगुली आणि शिखर धवनच्या नावावर आहे.
गांगुलीने त्याच्या कसोटीत 16 शतके केली असून त्याने शतक केलेल्या कोणत्याच कसोटी सामन्यात भारताने पराभव स्विकारलेला नाही.
भारतीय क्रिकेटमध्ये दादा म्हणून ओळखल्या गेलेल्या गांगुलीने त्याच्या कारकिर्दीत 113 कसोटी सामन्यांमध्ये 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत.
गांगुलीने वनडेमध्ये 311 सामने खेळताना 22 शतकांसह 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत.
गांगुलीने खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेट प्रशासनात पाऊल टाकले. त्याने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भुषवले.