Pramod Yadav
सोनिया गांधी यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 रोजी इटलीतील लुसियाना, विसेन्झा येथे एका रोमन कॅथोलिक कुटुंबात झाला.
प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, भाषेच्या शिक्षणासाठी केंब्रिज, इंग्लंड येथे गेल्या, जिथे त्यांची भेट राजीव गांधींशी झाली आणि नंतर 1968 मध्ये त्यांच्याशी लग्न केले.
भारताचे माजी पंतप्रधान, त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सात वर्षांनी, 1998 मध्ये त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, 22 वर्षे या पदावर त्या होत्या.
काँग्रेस पक्षाच्या 125 वर्षांच्या इतिहासात त्या सर्वात जास्त काळ पक्षाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसने 2004 च्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले.
2009 मध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवर आले. यावेळी स्थापन झालेली युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
2007 मध्ये, सोनिया गांधी यांना जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून घोषित केले होते आणि 2007 मध्ये एका विशेष यादीत त्या 6 व्या क्रमांकावर होत्या.
2010 मध्ये, फोर्ब्स मासिकाने गांधींना जगातील नवव्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून स्थान दिले होते. फोर्ब्सच्या पॉवरफुल लोकांच्या यादीत त्या 2012 मध्ये 12 व्या स्थानावर होत्या.
2007 आणि 2008 मध्ये टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये सोनिया गांधी यांचे देखील नाव होते.
सर्वाधिक काळ पक्षाच्या अध्यपदी राहिलेल्या सोनिया गांधी कधीच पंतप्रधानपदी विराजमान झाल्या नाहीत.