गोमन्तक डिजिटल टीम
सवनीय पवमान आवृत्ती नंतर ब्रह्मवृंदांनी मंत्रघोषामध्ये सोमरस तयार करण्यास सुरुवात केली.
वेदांमध्ये सांगितलेल्या पद्धतीने सोम वनस्पतीचा रस काढण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंची जुळजाजुळवं करून त्यांची पूजा करण्यात आली.
तदनंतर प्रत्यक्ष सोम रस काढण्यात आला. यासाठी विशिष्ट प्रकारची भांडी वापरण्यात आली.
सोम वनस्पतीच्या छोट्या फांद्यां बत्त्याच्या साहाय्याने कुटून रस काढण्यात आला.
अशा विशिष्ट प्रकारे तयार झालेला सोमरस कुपीमध्ये साठवून ठेवण्यात आला