गोमन्तक डिजिटल टीम
अग्निष्टोम महासोमयागाच्या निमित्ताने यज्ञमंडपी सवत्स धेनुची पूजा करण्यात आली
सोमयज्ञाच्या चौथ्या दिवसाची सुरूवात प्रवर्ग्य विधीने झाली.
प्रवर्ग्य विधीकरिता तूप तापविण्यासाठी विशिष्ट आकाराची प्रवर्ग्य पात्रे वापरण्यात आली.
प्रवर्ग्य हवनासाठी दूधाचा वापर करण्यात आला.
मंत्र पठण करीत सकाळी प्रवर्ग्याची आहुती देण्यात आली.
प्रवर्ग्य विधीसाठी वापरलेले साहित्य अग्निमध्ये समर्पित केले गेले.