घोरण्यामुळे होतोय घटस्फोट; कपल्समध्ये वाढतोय 'स्लीप डिवोर्स'चा ट्रेंड

Akshata Chhatre

धावपळीचं आयुष्य

आजकाल बदलती जीवनशैली आणि धावपळीचं आयुष्य अनेक कपल्सच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करत आहे.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

सतत वाद

पर्सनल आणि प्रोफेशनल जबाबदाऱ्यांमधील असमतोल, थकवा, वेळेचा अभाव यामुळे नात्यांमध्ये सतत वाद होत असल्याचं चित्र दिसतं.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

घटस्फोट

काही प्रकरणांत या वादांमुळे नातं इतकं बिघडतं की, घटस्फोट हाच एकमेव पर्याय वाटू लागतो.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

स्लिप डिवोर्स

मात्र, या टोकाच्या निर्णयापर्यंत न जाता, काही जोडपी एक वेगळा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत तो म्हणजे स्लिप डिवोर्स.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

वेगळं राहण्याचा निर्णय

झोपेसाठी एकमेकांपासून वेगळं राहण्याचा कपल्सने घेतलेला परस्पर सहमतीचा निर्णय म्हणजे स्लिप डिवोर्स. एकाच घरात राहून, एकत्र संसार करत असूनही, फक्त झोपण्यासाठी वेगवेगळ्या खोलीत झोपणे.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

कपल्स स्पेस

एका पार्टनरचं घोरणं, मोबाईलचा वापर, रात्री काम करणं किंवा सतत चळवळ केल्याने दुसऱ्याची झोप मोड होते. अशा वेळेस सतत वाद घालण्यापेक्षा, काही कपल्स 'स्पेस' देणं पसंत करतात.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

तणावमुक्त जीवन

चांगली झोप ही तणावमुक्त जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास मानसिक अस्वस्थता, चिडचिड, थकवा आणि नात्यातील संवादाचा अभाव निर्माण होतो.

sleep divorce| snoring and divorce | Dainik Gomantak

केसांना टक्कल पडायची वेळ आली पण 'हे' तेल वापरलं नाही?

आणखीन बघा