Pranali Kodre
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना अनेक क्रिकेट चाहत्यांचा क्रश ओळखली जाते.
27 वर्षीय स्मृती सध्या पलाश मुच्छलला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
पलाश प्रसिद्ध म्युझिक कम्पोझर आणि गायिका पलक मुच्छलचा लहान भाऊ आहे.
सध्या स्मृती भारतीय संघासह बांगलादेश दौऱ्यावर आहे. त्यामुळे तिला 18 जुलैला तिच्या 27 व्या वाढदिवशी त्याने ढाका येत सरप्राईजही दिले होते.
पलाशने स्मृतीबरोबरचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्मृती आणि पलाश गेल्या 4 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जाते.
त्यांच्या दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर भारतीय महिला संघातीन अन्य खेळाडूंच्या कमेंट्स पाहूनही अनेकांनी त्यांच्या रिलेशनशीपबद्दल अंदाज बांधले आहेत.
तसेच अनेकदा ते दोघे एकत्रही दिसले आहेत.