Akshata Chhatre
पालकांनो, आता काळजी करू नका! दूध न पिणाऱ्या मुलांनाही योग्य आहारातून कॅल्शियम मिळू शकतं.
नाचणीत भरपूर कॅल्शियम असतं. नाचणीची इडली, डोसा, पराठा मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय ठरतो.
पालक पनीर, पालक पराठा हे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय. त्यात कॅल्शियमसोबत आयर्नही भरपूर प्रमाणात असतं.
तीळाचे लाडू, तीळ चटणी हे स्वाद आणि पोषण दोन्ही पुरवतात. हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.
राजगिरा म्हणजे आयर्न आणि कॅल्शियमचा कॉम्बो. खसखसची चव आणि पोषण मुलांना सहज आवडतं.
भिजवलेले बदाम, चण्याचं फुटाणं टिफिनसाठी झटपट बनतात व आरोग्यदायी पर्याय आहेत.
हे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट करा आणि मुलांच्या हाडांना द्या योग्य पोषण, दुधाशिवायही.