Akshata Chhatre
देशातील सर्वात छोटे राज्य म्हणून गोवा प्रसिद्ध आहे, मात्र याच छोट्याशा राज्यात पर्यटकांची ये-जा सुरूच असते.
मग एवढ्या छोट्याशा राज्यात जेव्हा भरपूर पर्यटक येतात तेव्हा तिथे गर्दी होत नसेल का? गोव्याचं एकूण क्षेत्रफळ तरी किती?
गोवा राज्याचे एकूण क्षेत्रफळ ३,७०२ चौरस किलोमीटर आहे.
प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची विभागणी दोन महसुली जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे; उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा.
गोवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला आहे आणि मुंबई शहरापासून रस्तेमार्गे ५९४ किमी अंतरावर आहे.
उत्तरेला तेरेखोल नदी आहे, जी गोवा आणि महाराष्ट्राला वेगळे करते. पूर्वेला आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची सोय आरामात केली जाते.