Manish Jadhav
स्कोडा ऑटो इंडियाने आपली फ्लॅगशिप SUV कोडियाकचा नवीन बेस व्हेरिएंट 'कोडियक लाउंज' लाँच केला आहे. हा व्हेरिएंट स्पोर्टलाइन आणि L&K या दोन्ही मॉडेल्सच्या खाली येतो. याची एक्स-शोरुम किंमत 39.99 लाख आहे.
हा नवीन व्हेरिएंट फक्त 5-सीटर सेटअपमध्ये उपलब्ध आहे. यामुळे, 7-सीटर मॉडेल्सच्या तुलनेत यात अधिक बूट स्पेस मिळते. या व्हेरिएंटची बूट स्पेस 786 लीटर आहे, तर 7-सीटर व्हेरिएंटची बूट स्पेस 281 लीटर आहे.
कोडियक लाउंजमध्येही इतर व्हेरिएंट्सप्रमाणेच 2.0-लिटर, फोर-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 204 bhp ची दमदार पॉवर देते. यासोबतच यात 7-स्पीड ड्यूल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) सिस्टीम मिळते.
या मॉडेलला 18-इंच मॅजेनो अलॉय व्हील्स आणि मॅट डार्क क्रोम इन्सर्ट्स देण्यात आले आहेत. हे तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे: मून व्हाइट, मॅजिक ब्लॅक आणि ग्रेफाइट ग्रे.
कॅबिनमध्ये ग्रे 'Suedia' फॅब्रिक अपहोल्स्ट्री आणि टू-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील आहे. यात पॅनोरॅमिक सनरुफ, 10.25-इंच व्हर्च्युअल कॉकपिट, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जर यांसारखे प्रीमियम फीचर्स कायम ठेवण्यात आले आहेत.
किंमत कमी ठेवण्यासाठी या व्हेरिएंटमधून काही फीचर्स वगळण्यात आले आहेत. यात 12.9-इंच मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, ड्रायव्हर ड्रोसिनेस डिटेक्शन, कँटन साउंड सिस्टीम आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स नाहीत.
एंट्री-लेव्हल मॉडेल असूनही, यात सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यात 9 एअरबॅग्स, ABS, EBD, ESC, हिल-होल्ड कंट्रोल, हिल-डिसेंट कंट्रोल आणि मल्टी-कॉलिजन ब्रेकिंग सिस्टीम यांसारखे महत्त्वाचे सुरक्षा फीचर्स दिले आहेत.
कोडियक लाउंजची किंमत स्पोर्टलाइनपेक्षा 3.77 लाख आणि L&K पेक्षा 5.97 लाख कमी आहे. किंमतीच्या बाबतीत, हे व्होक्सवॅगन टिगुआनपेक्षा स्वस्त आहे, पण ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन C5 एअरक्रॉसपेक्षा महाग आहे.