दैनिक गोमन्तक
रंगाची उधळण करत होळीचा सण साजरा केला जातो.
पण रंग लावण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे महत्वाचे असते. मात्र आपल्या चेहऱ्याची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्याचे फार काळ दुष्परिणाम होऊ शकतात.
होळीआधी चेहऱ्याला तुम्ही नेहमी वापरत असाल ती सनस्क्रीम लावा. त्यावर तुम्ही तेल लावू शकता. यामुळे रंग तुमच्या त्वचेच्या आतपर्यंत पोहचणार नाही.
होळी झाल्यानंतर म्हणजेच जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरील रंग काढत असतो तेव्हा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
रंग काढताना त्वचा जास्त जोरात चोळू नका किंवा स्क्रब करु नका
अंघोळ केल्यानंतर मॉइश्चराइझर लावल्याने त्वचेची योग्य काळजी घेतली जाऊ शकते. याबरोबरच, आपल्या तज्ञांचा सल्ला घेणेदेखील योग्य ठरते.