Pramod Yadav
विविध क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे अलिकडे अनेक क्षेत्रात गलेलठ्ठ पगार देणाऱ्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. असेच सहा क्षेत्रातील जॉबबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मशीन लर्निंग इंजिनिअरिंगमध्ये सध्या मोठी संधी असून, यात तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते.
कुत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात (एआय) अलिकडे अधिक संधी निर्माण झाल्या आहेत. आरोग्य, वित्त आणि ई-कॉमर्स क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
सध्या डिजिटल युगात डेटाचे नियोजन आणि विश्लेषण करणाऱ्या तज्ञ लोकांची गरज अधिक आहे. तेव्हा या क्षेत्रात देखील उत्तम पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
ब्लॉकचेन डेव्हलपरची सध्या मार्केटमध्ये खूप मागणी असून, या क्षेत्रात फार कमी लोक आहेत.
क्लाऊड सोल्युशन आर्किटेक्ट यांना स्पेशलाईजड ज्ञानामुळे विविध उद्योगक्षेत्रात मागणी आहे. उद्योगातील विशिष्ठ कामासाठी त्यांना चांगल्या पगाराची ऑफर दिली जाते.
सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती होत असताना त्यातील धोके देखील वाढले आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्व वाढले असून, यातील ज्ञान असणाऱ्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळत आहे.