Sindhudurg Fort: 75 हजार किलो शिशाची भक्कम साथ, समुद्राचा अजिंक्य सम्राट; लाटांच्या छाताडावर उभा असलेला शिवरायांचा 'सिंधुदुर्ग'!

Manish Jadhav

समुद्रातील अजिंक्य दुर्ग

सिंधुदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील 'कुरटे' नावाच्या बेटावर बांधलेला एक भक्कम जलदुर्ग आहे.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

शिवरायांचे स्वप्न

या किल्ल्याची पायाभरणी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 मध्ये केली होती. स्वराज्याच्या समुद्री सीमांचे रक्षण करणे हा यामागील मुख्य उद्देश होता.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

भक्कम पायाभरणी

किल्ल्याचा पाया रचताना तब्बल 75,000 किलो (200 मण) शिसे वापरण्यात आले होते, जेणेकरून समुद्राच्या लाटांचा त्यावर परिणाम होऊ नये.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

अवाढव्य तटबंदी

या किल्ल्याची तटबंदी सुमारे 3 किलोमीटर लांब आणि 30 फूट उंच आहे. या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला शत्रूसाठी अभेद्य ठरला.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

शिवराजेश्वर मंदिर

या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव मंदिर आहे, जे त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

पाण्याचे स्त्रोत

समुद्राच्या मधोमध असूनही या किल्ल्यावर 'दूधबाव', 'दहीबाव' आणि 'साखरबाव' नावाच्या गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

हस्त आणि पाऊलखुणा

गडावर आजही शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे एका घुमटाकार कोनाड्यात जतन केलेले पाहायला मिळतात.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

पर्यटकांचे आकर्षण

दरवर्षी लाखो पर्यटक या ऐतिहासिक वास्तूला भेट देतात. येथे पोहोचण्यासाठी मालवण बंदरातून बोटीने जावे लागते, जो एक रोमांचक अनुभव असतो.

Sindhudurg Fort | Dainik Gomantak

Pomegranate Juice: "सूर्याच्या कोपावर डाळिंबाचा प्रहार!" उन्हाळ्यातील प्रत्येक समस्येवर एकच 'लाल' उपाय!

आणखी बघा