Sameer Amunekar
राग किंवा चिडचिड होताच खोल श्वास घ्या व हळूहळू सोडा. मन शांत होण्यास मदत होते.
दररोज थोडा वेळ चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करा. शरीर ताजेतवाने राहते आणि तणाव कमी होतो.
झोपेची कमतरता ही चिडचिडीचे मोठे कारण आहे. नियमित वेळेवर व पुरेशी झोप घेतल्यास मूड संतुलित राहतो.
परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचार टाळा.
संगीत ऐकणे, वाचन करणे, छंद जोपासणे यामुळे मन आनंदी होते.
जंक फूड, कॅफिन किंवा जास्त मसालेदार पदार्थ टाळा. हलका व पौष्टिक आहार मन-शरीर शांत ठेवतो.
परिस्थिती चिडचिड करणारी असेल तर थोडा वेळ बाजूला व्हा, शांत व्हा आणि मग निर्णय घ्या.