Akshata Chhatre
तुम्हाला लांब, मजबूत आणि आकर्षक केस हवेत? पण त्यासाठी पार्लरमध्ये जायचं नाहीये? काळजी करू नका तुम्ही घरीच काही सोपे पर्याय वापरून लांबलचक केस मिळवू शकता.
कांद्याचा रस हा केसांसाठी बहुगुणी आहे. कांद्याचा रस स्कॅल्पला लावा आणि १५-२० मिनिटं ठेवा, त्यांनतर सौम्य शाम्पूने धुवा. कांद्यातील सल्फर केसांच्या मुळांना बळकटी देतं.
खोबरेल, बदाम किंवा कडुलिंबाचं तेल गरम करून लावा. १० मिनिटं मसाज करा आणि १ तास ठेवा यामुळे रक्ताभिसरण सुधारते, केसांच्या वाढीस चालना मिळते.
१ अंडं + १ चमचा लिंबू मिसळून केसांना लावा आणि २० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. प्रोटीन व व्हिटॅमिन B केसांना पोषण देतात
रात्रभर मेथी भिजवून वाटून पेस्ट तयार करा आणि ती स्कॅल्पला लावा, अर्धा तास ठेवा. यामुळे केस गळती कमी होते आणिनवीन केस उगमाला मदत मिळते.
प्रोटीन, बायोटिन, आयर्नयुक्त आहार तसेच भाजी, डाळी, फळं आणि दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या.