Akshata Chhatre
वडीलधारी मंडळी सतत चांगल्या संगतीचे महत्त्व अधोरेखित करत असतात, कारण संगत आपल्या चारित्र्यावर खोल परिणाम करते.
जर पालकांनी वेळेत लक्ष दिलं नाही, तर चुकीची संगत मुलांचे आचरण, आत्मविश्वास, अभ्यास आणि अखेरच्या टप्प्यावर भविष्य देखील बिघडवू शकते.
जर मुलं सतत त्यांच्या शिक्षकांबद्दल तक्रार करत असतील, त्यांचं महत्त्व कमी करत असतील, तर ते त्यांच्या संगतीचा परिणाम असू शकतो.
मुलं जर मित्रांच्या चुकीच्या गोष्टी योग्य ठरवत असतील किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करत असतील, तर ही एक मोठी चेतावणी आहे.
मुलं अचानक स्वतःबद्दल नकारात्मक बोलू लागली, "मी काहीच करू शकत नाही" असे विचार करत असतील, तर त्यांच्या मैत्रीचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर असू शकतो.
जर मुलं मोबाईल लपवून बोलत असतील, चॅटिंग करताना स्क्रीन लपवत असतील, तर पालकांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे.
मुलं जर अचानक अभ्यास टाळू लागली, गृहपाठ पुढे ढकलू लागली, किंवा शाळेत जाणं टाळत असतील, तर हे फक्त आळस नसून, वाईट संगतीचं संभाव्य लक्षण असू शकतं.