Kavya Powar
आजकाल सगळीकडे तुम्हाला इअरफोन किंवा हेडफोन घातलेले लोक दिसतील.
आता इअरफोन्स हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. कधी फोनवर बोलण्यासाठी तर कधी ऑनलाइन क्लासेससाठी इअरफोन वापरण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
या सगळ्यात इयरफोन्स आपल्यासाठी किती हानिकारक आहेत हे आपण विसरलो आहोत. इयरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही तर कानाला संसर्ग होण्याची आणि कानाला इजा होण्याची शक्यताही वाढते.
जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानांवर वाईट परिणाम होतो. यामुळे कानात वेदना होऊ शकतात.
यामुळे श्रवण पेशी त्यांची संवेदनशीलता गमावू लागतात आणि बहिरेपणा देखील होऊ शकतो.
दररोज इयरफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणे तुमच्या कानांसाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे केवळ कानालाच नाही तर मेंदूलाही मोठी हानी होते.
जास्त वेळ इअरफोनद्वारे गाणी ऐकल्याने तुमचे कान सुन्न होऊ शकतात, ज्यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता कालांतराने कमी होऊ शकते.