Sameer Amunekar
श्वेता तिवारी ही केवळ एक उत्तम आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जात नाही, तर ती एक स्टाईल आयकॉनसुद्धा आहे.
श्वेताचा फिटनेस, सौंदर्य आणि आत्मविश्वास पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण आहे. मात्र श्वेताला या फॅशन जगतात एक जबरदस्त टक्कर देणारी अजून एक अभिनेत्री आहे ती म्हणजे भाग्यश्री.
भाग्यश्री हिची कारकीर्द काहीशी वेगळी आहे. लग्नानंतर तिने बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःच्या खासगी आयुष्याला प्राधान्य दिलं.
आजही ती तिच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहे. सध्या ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून तिथून ती आपल्या फॅशन सेन्स, हेल्थ आणि ब्यूटीबाबत अपडेट्स शेअर करत असते.
भाग्यश्री वयाच्या ५६ व्या वर्षीही ज्या प्रकारे स्वतःला तंदुरुस्त ठेवते, ते पाहून अनेकजणी थक्क होतात.
योगा, हेल्दी डायेट आणि सकारात्मक जीवनशैली ह्यामुळे ती आजही तरुण दिसते. तिचे स्किन ग्लो, केसांची चमक आणि आकर्षक शरीरयष्टी ही तिच्या आरोग्याविषयी असलेल्या जागरूकतेचं द्योतक आहे.
भाग्यश्री आपल्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्या चाहत्यांशी कायम संपर्कात असते.