Pranali Kodre
भारतात सध्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध सामने खेळले आहेत.
मात्र, वर्ल्डकप सुरू होण्याच्या अगदी तोंडावरच भारताचा स्टार युवा क्रिकेटपटू शुभमन गिलला डेंग्यु झाल्याचे निदान झाले.
डेंग्युमुळे त्याला पहिल्या दोन्ही सामन्यात खेळता आले नव्हते. गिलला चेन्नईमध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही करण्यात आले होते.
मात्र, आता तो या आजारातून बऱ्यापैकी सावरला असून पाकिस्तानविरुद्ध १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याआधी अहमदाबादमध्ये भारतीय संघात पुन्हा सामीलही झाला आहे.
गिलने भारतीय संघासह सरावालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्याची पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची अपडेट दिली आहे, त्याने सांगितले आहे की '९९ टक्के गिल खेळण्यासाठी उपलब्ध आहे, पण सामन्याच्या दिवशी अंतिम निर्णय घेऊ.'
दरम्यान गिलसाठी हा पहिलाच वनडे वर्ल्डकप आहे.
24 वर्षीय गिलने वनडे कारकिर्दीमध्ये 35 सामन्यांमध्ये 66.1 च्या सरासरीने 1917 धावा केल्या आहेत.