Shubman Gill ची वनडेतील चार शतके

Pranali Kodre

भारताचा 23 वर्षीय फलंदाज शुभमन गिल सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्याने नुकतेच इंदोरमध्ये 24 जानेवारी 2023 रोजी झालेल्या वनडेत 78 चेंडूत 112 धावांची खेळी करत त्याचे चौथे शतक झळकावले.

Shubman Gill | Dainik Gomantak

शुभमनने चार वनडे शतके केवळ 21 वनडे डावात खेळताना केले आहेत.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्यामुळे तो सर्वात जलद चार वनडे शतके करणारा भारतीय खेळाडूही ठरला.

Shubman Gill | Dainik Gomantak

विशेष गोष्ट अशी की शुभमनच्या चार वनडे शतकांमध्ये त्याच्या 149 चेंडूतील 208 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्याने 208 धावांची द्विशतकी खेळी न्यूझीलंडविरुद्ध 18 जानेवारी 2023 रोजी हैदराबादला झालेल्या वनडे सामन्यात केली होती.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्यावेळी तो वनडेत द्विशतकी खेळी करणारा भारताचा पाचवा खेळाडू, तसेच सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला होता.

Shubman Gill | Dainik Gomantak

शुभमनने यापूर्वी 22 ऑगस्ट 2022 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे पहिल्यांदा वनडे शतक केले होते.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्याने हरारे वनडेत 97 चेंडूत 130 धावांची खेळी केली होती.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्यानंतर त्याने 15 जानेवारी 2023 रोजी श्रीलंकेविरुद्ध तिरुअनंतपुरम येथे झालेल्या वनडेत त्याचे दुसरे शतक झळकावले होते.

Shubman Gill | Dainik Gomantak

त्याने 97 चेंडूत 116 धावांची खेळी करत त्याचे दुसरे वनडे शतक झळकावले होते.

Shubman Gill | Dainik Gomantak
Rohit Sharma | Dainik Gomantak